10.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा

10.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) कमलकिशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे व एम ए सईद, आयोगाचे सदस्य सचिव रवींद्र शिसवे तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.