10.10.2022 : राज्यपालांनी दिली कर्वे समाज सेवा संस्थेला भेट

10.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कर्वेनगर पुणे येथील समाज सेवा शिक्षण या विषयातील अग्रणी संस्था असलेल्या कर्वे समाज सेवा संस्थेला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या कार्याचा गौरव करून कर्वे समाज सेवा संस्थेने महर्षी कर्वे तसेच संस्थापक भास्कर कर्वे यांना अभिप्रेत कार्य करावे तसेच भविष्यातील वाटचालीसाठी आराखडा तयार करावा अशी सूचना राज्यपालांनी केली.