10.07.2026:राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन
10.07.2026:’फॉर्च्युन इंडिया’ मासिकातर्फे देण्यात येणार्या ‘फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन’ पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल फोर सीझन्स मुंबई येथे झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. उदघाटन सत्राला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका, फॉर्च्युन इंडिया समूहाचे मुख्य संपादक सौरव मुजुमदार आदी उपस्थित होते. यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.