10.07.2024: राघवेंद्र स्वामी यांच्या ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
10.07.2024: श्रीक्षेत्र ‘मंत्रालयम्’ येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी 17 व्या शतकात लिहिलेल्या ‘श्रीकृष्णचारित्र्यमंजिरी’ या लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले. यावेळी श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालयम् येथील विद्यमान पिठाधिपती स्वामी सुबुधेन्द्र तीर्थ, मुंबई येथील मठाचे विश्वस्त रामकृष्ण तेरकर व अनुवादकर्ते प्रा गुरुराज कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.