10.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उदघाटन संपन्न
10.06.2022 : गोवा मुक्ती लढा तसेच सन १९७१ च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, महाराष्ट्र पोलीस मुख्यालयासमोर, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.