10.04.2026: राज्यपालांच्या हस्ते “विकसित भारतासाठी कॉस्ट ऑडिट” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
10.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय कॉस्ट ऑडिट संस्थेतर्फे आयोजित “विकसित भारतासाठी कॉस्ट ऑडिट” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन केले. उदघाटन सत्राला एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. रमाकांत पांडा, भारतीय कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स संस्थेचे अध्यक्ष टी.सी.ए. श्रीनिवास प्रसाद, उपाध्यक्ष नीरज जोशी, व्यावसायिक विकास समितीचे अध्यक्ष मनोज आनंद, आयसीएमएआयचे माजी अध्यक्ष विकास देवधर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती तसेच संस्थेचे सदस्य व व्यावसायिक उपस्थित होते. कॉस्ट ऑडिट ही केवळ अनुपालनाची गरज नसून आर्थिक प्रशासनासाठी एक धोरणात्मक साधन आहे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारतीय कॉस्ट ऑडिट संस्थेने आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती मुंबई, पुणे आदी महानगरांबाहेरील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये देखील करून द्यावी जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संधींची माहिती होईल, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. सूचीबद्ध कंपन्या, गृहपयोगी वस्तू उत्पादक, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पतसंस्थांमध्ये देखील कॉस्ट ऑडिट अनिवार्य करण्याची त्यांनी सूचना केली.