10.04.2025 : महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांचे भाषण

10.04.2025 : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे आयोजित ‘महावीर स्वामी जन्म कल्याणक’ महोत्सव राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत योगी सभागृह मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जैन जगत’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाला जैन आचार्य नयपद्मसागर महाराज, साध्वीश्री प्रियंवदा, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, भारत जैन महामंडळ संस्थेचे अध्यक्ष सी सी डांगी, माजी अध्यक्ष तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.