10.02.2022: राज्यपालांनी राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले
10.02.2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज ४ दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे.