10.01.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २० वा दीक्षांत समारोह संपन्न
10.01.2025 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २० वा दीक्षांत समारोह महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यापीठ परिसरात सपंन्न झाला. यावेळी एकूण १५२९१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ७१ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी तसेच ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इन्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती पदमभूषण प्रा. ज्येष्ठराज भा. जोशी यांनी दीक्षांत भाषण केले. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. श्रीकांत अंधारे, कुलसचिव योगिनी घारे तसेच विविध विभागाचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच स्नातक उपस्थित होते.