09.12.2024:राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण
09.12.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले. विधानमंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.