09.12.2023: राज्यपालांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण
09.12.2023: रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वर्धा येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुळ वर्धा येथील रहिवासी आणि आता देशभर नावलौकिक कमाविलेले भरत मेहता, मुंबई, तुषार व्यास, शिरीष पुरोहीत, बैंगलूरू, डॅा.प्रिती बजाज, दिल्ली यांना सन्मानित करण्यात आले. समावेश आहे. यावेळी माजी खासदार सुबोध मोहिते, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणूगोपाल, रोटरीचे प्रकल्प अधिकारी चंद्रेश मांडविया, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीचे अध्यक्ष मनोज मोहता, महेश मोकलकर उपस्थित होते.