09.12.2020 : आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी घेणार विशेष बैठक
09.12.2020 : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले. विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली.