09.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

09.11.2020 : महाराष्ट्रचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक वरील नोंदी, निरीक्षणे, स्पुड लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेले ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.