09.10.2021: राज्यपालांच्या हस्ते नवी मुंबई, ठाणे येथील करोना योद्धे सन्मानित
09.10.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नवी मुंबई तसेच ठाणे येथील डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील ३० करोना योद्ध्यांना करोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. जय फाउंडेशन व रुद्र फाउंडेशनतर्फे करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.