09.09.2021: पूरग्रस्त कुटुंबातील मुलींना प्रमाणपत्र मुदत ठेव प्रमाण पत्र प्रदान
09.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सांगली येथे पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खा. संजय पाटील, खा. धैर्यशिल माने, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली सय्यद-भोसले आदी उपस्थित होते.