09.08.2026: राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद
09.08.2026: कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार असून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर ‘ग्रंथांचा ग्रंथ’ असलेली भगवत गीता निर्माण झाली नसती असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. जेन-झी व जेन-अल्फा या विद्यार्थी व युवकांच्या मुंबईत सुरु असलेल्या ४ दिवसांच्या ‘आयमीन’ चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. परिषदेचे आयोजन इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (IIMUN) संस्थेने केले. या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील तसेच पाच इतर देशांमधील २,१०० युवक सहभागी झाले. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात युवकांची परिषद गेल्या १५ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगितले. आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जायचे हे या पिढ्या ठरवतील असे शाह यांनी सांगितले. परिषदेचे मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तसेच स्तुती तक देखील यावेळी उपस्थित होते.