09.09.2024: राज्यपालांची नाशिक येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध विकास योजनांबाबत आढावा बैठक

09.09.2024 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात आज शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध विकास योजनांचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यावेळी उपस्थित होते.