09.06.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘पाथवे टू वल्र्ड पीस’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

09.06.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘पाथवे टू वल्र्ड पीस’ या एमआयटी विश्वशांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांनी संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला डॉ विश्वनाथ कराड, डॉ राहुल कराड, डॉ मंगेश कराड आदी उपस्थित होते. टाइम्स समूहाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये विश्वशांती या विषयावर विविध गणमान्य व्यक्तींनी लिहिलेल्या लेखांचे तसेच भाषणांचे संकलन करण्यात आले आहे.