09.06.2022: पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा शताब्दी सांगता सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्

09.06.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विलेपार्ले मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा शताब्दी सांगता समारोह संपन्न झाला. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू, संचालिका डॉ स्नेहलता देशमुख व संस्थेचे सचिव दिलिप पेठे प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या शताब्दी गौरव ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले