09.04.2026: ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या वरील बैठकीला राज्यपालांचे संबोधन
09.04.2026: संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे आयोजित ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावरील तज्ज्ञांच्या बैठकीला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी हॉटेल ताज महाल पॅलेस मुंबई येथे संबोधित केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.शाश्वततेशिवाय झालेल्या विकासाला ‘विकास’ म्हणता येणार नाही असे सांगून राज्यपालांनी प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन, उद्योग जगत, आणि नागरिकांनी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख अधिकारी बाळकृष्ण पिशुपती, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक आर. केशवन, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.