09.03.2026: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे सपत्नीक आगमन
09.03.20026: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती आदींनी त्यांचे स्वागत केले. मंगळवार दिनांक १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता नवनियुक्त राज्यपालांचा लोकभवन येथे शपथविधी होणार आहे.