09.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा दीक्षांत समारोह
09.02.2023 : सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या किवळे, पुणे येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्नातकांना पदव्या तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी सिम्बायोसिसचे कुलपती डॉ एस बी मुजुमदार, प्रकुलपती डॉ स्वाती मुजुमदार, कार्यक्रमाचे विशेष अतिथी व फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स लिमिटेडचे अध्यक्ष राजेश खत्री, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु डॉ गौरी शिऊरकर, कुलसचिव ले. कर्नल प्रशांत कुलकर्णी, विद्यापीठाच्या प्रशासन मंडळाचे सदस्य, शिक्षक व स्नातक विद्यार्थी होते.