09.01.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेचे उदघाटन संपन्न
09.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शाश्वत भवितव्यासाठी बांबू क्षमतेचा उपयोग’ या विषयावरील पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेचे उदघाटन सत्र संपन्न झाले. फिनिक्स फाऊंडेशन, लोडगा, लातूर या संस्थेच्या पुढाकाराने या शिखर परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जा आणि संसाधन संस्थेच्या महासंचालक (टेरी) डॉ. विभा धवन यांच्या पुढाकाराने तज्ज्ञांचे चर्चासत्र संपन्न झाले. ‘वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे संस्थापक-विश्वस्त हेमेंद्र कोठारी, मनरेगा मिशन महासंचालक नंद कुमार, यांसह पर्यावरण क्षेत्रातील प्रतिनिधींनी चर्चासत्रात भाग घेतला. सुरुवातीला राज्यपालांनी बांबू उत्पादनांच्या विविध स्टाल्सला भेट दिली, ‘माझी वसुंधरा अभियाकन’, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको, ‘टेरी’ आदी संस्थांच्या सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले.