08.12.2020 : सेवाभाव व करुणा यामुळे करोनाविरुद्ध लढा यशस्वी: राज्यपाल

08.12.2020 : करोना संसर्गाच्या संकट काळात मानवसेवा हिच ईश सेवा आहे असे मानून लोकांनी सेवाभाव व करुणा जागवली. त्यामुळेच अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनाचा मुकाबला अधिक चांगल्या पध्दतीने केला, असे प्रशांसोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे काढले. भारतीय विकास संस्थान या सेवाभावी संघटनेतर्फे राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते करोना योध्दयाचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.