08.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिन संपन्न
08.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिवस मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ८ जुलै १९४५ रोजी या संस्थेची स्थापना केली होती. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२६’ विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच उद्योजक पद्मश्री अशोक खाडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, विश्वस्त अॅड. बी. के. बर्वे, डॉ वेंकट स्वामी व अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.