08.07.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा
08.07.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या मुख्य उपस्थितीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त उज्वल निकम, एडव्होकेट बी.के. बर्वे, सचिव डॉ वामन आचार्य, सहसचिव डॉ यु एम मस्के, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते. सिम्बायोसिस सोसायटीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी शांताराम मुजुमदार, सरकारी वकील उज्वल निकम, एडव्होकेट बी.के. बर्वे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा सुरेश गोसावी, चैत्यभूमी स्मारक समितीचे महासचिव नागसेन कांबळे, लोककलेचे अभ्यासक गणेश चंदनशिवे, यशदाचे बबन जोगदंड, सिंघानिया शाळेच्या संचालिका रेवती श्रीनिवासन आदींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.