08.04.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता व सौहार्द’ या विषयावर परिसंवाद संपन्न

08.04.2025 : महावीर जयंतीचे औचित्य साधून ‘सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता व सौहार्द’ या विषयावर आयोजित परिसंवाद राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पु.ल. देशपांडे अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. परिसंवादाचे आयोजन लोकमत मीडिया समूह आणि अहिंसा विश्व भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. परिसंवादात बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक डॉ. आचार्य लोकेश, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉ. भदंत राहुल बोधी महाथेरो, माजी पोलीस महासंचालक डॉ पी एस पसरीचा हे सहभागी झाले होते. यावेळी उभय राज्यपालांच्या हस्ते सेलो ग्रुपचे संचालक प्रदीप राठोड, JITO चे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिमणलाल डांगी, उज्वल पगारिया, विशाल चोरडिया, नितीन खारा, प्रकाश धारिवाल, राजेश जैन यांना ‘लोकमत पीस अँड हार्मनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.