08.01.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एचएसएनसी, मुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारोह संपन्न

08.01.2025: एचएसएनसी, मुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारोह महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज वरळी येथील विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सपंन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील 38 गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. यावेळी एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ जयेश जोगळेकर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच स्नातक उपस्थित होते.