07.12.2023: राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
07.12.2023: सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांच्या जॅकेटला सशस्त्र सेनेच्या ध्वजाचे तिकीट लावण्यात आले व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. कार्यक्रमाला नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य अधिकारी व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले.जन. एच.एस. कहलों, एअर ऑफीसर कमाडींग हेडक्वाटर, मरिटाईम एअर ऑपरेशन, एअर वाईस मार्शल रजत मोहन, कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) राजेश गायकवाड तसेच ध्वज निधीला योगदान देणार्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सन 2022-23 या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.