07.11.2025: ‘वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी, ‘राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले’
07.11.2025: बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या सार्धशताब्दी निमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन केले. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘वंदे मातरम् ‘ या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.