07.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जव्हार येथे पालघर व नाशिक जिल्ह्यातील १२२ पेसा ग्रामसभांचे महासंमेलन संपन्न

07.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जव्हार येथे पालघर व नाशिक जिल्ह्यातील १२२ पेसा ग्रामसभांचे महासंमेलन संपन्न झाले. संमेलनाचे आयोजन ‘वयम’ या संस्थेतर्फे करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ग्रामसभा ही केवळ सभा नसून एक छोटी संसदच आहे असे उद्गार राज्यपालांनी काढले. ग्रामसभांचे वैधानिक अधिकार सुरक्षित राहतील याची खबरदारी पाचव्या अनुसूची संरक्षक म्हणून घेईन असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाला ‘वयम’चे संस्थापक मिलिंद थत्ते, अध्यक्ष विनायक थाळकर, सीईओ दिपाली गोगटे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार हेमंत सावरा व अनेक ग्रामसभांचे पदाधिकारी उपस्थित होते.