07.09.2024: राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना

07.09.2024: गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे आपल्या ‘जल भूषण’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांसह गणरायाची आरती केली. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.