07.09.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यपालांना गणेशाची मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच उद्योगपती गौतम हरी सिंघानिया उपस्थित होते.