07.09.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘तू एक मुसाफिर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

07.09.2022: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांच्या ‘तू एक मुसाफिर या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभवन येथे संपन्न झाले.पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सोनाली पेडणेकर, प्र-कुलगुरू रविन्द्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, विविध विभागांचे अधिष्ठाता तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित निमंत्रित उपस्थित होते.