07.06.2024: राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान
07.06.2024: भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे २०२१- २०२३ या वर्षातील ‘प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते नेसको, गोरेगाव मुंबई येथे प्रदान करण्यात आले. यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एम पी तापडिया,यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर कौन्सिलचे माजी अध्यक्ष अरविंद गोयंका यांना विशेष सन्मान देण्यात आला. एकूण ७५ प्लास्टिक निर्यातदारांना ‘निर्यात उत्कृष्टता पुरस्कार’ देण्यात आले. कार्यक्रमाला प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, उपाध्यक्ष विक्रम भादुरिया व कार्यकारी संचालक श्रीबाश दासमोहपात्रा तसेच प्लास्टिक क्षेत्रातील उद्योजक, आंतरराष्ट्रीय खरीददार व निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.