06.12.2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपालांचे अभिवादन
06.12.2023: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा व संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे,सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी देखील डॉ आंबेडकर यांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.