06.12.2021: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला वंदन
06.12.2021: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला वंदन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालक मंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.