06.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते न्यूजरूम लाइव्ह दिवाळी अंकांचे प्रकाशन तसेच करोना काळात धैर्याने काम केल्याबद्दल पत्रकारांना शाबासकी
06.12.2020 : करोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली. राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या ‘न्यूजरूम लाइव्ह’ या मराठी दिवाळी अंकांचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले.