06.10.2021: राज्यपालांच्या हस्ते ‘उपासकदशा’ या पुस्तकाचे पुणे विद्यापीठ येथे प्रकाशन
06.10.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. (श्रीमती) विमल अनिल बाफना यांनी लिहिलेल्या ‘उपासकदशा’ या जैन आगमावर आधारित पुस्तकाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, जैन स्टडीजचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर प्रामुख्याने उपस्थित होते.