06.08.2025: राज्यपालांच्या हस्ते ‘सर्वोत्तम नागरिक सम्मान’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

06.08.2025: मेघाश्रेय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ प्रदान करण्यात आले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘सर्वोत्तम नागरिक सम्मान’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, मेघाश्रेय संस्थेच्या संस्थापिका सीमा सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण विजय भाटकर, अभिनेते अनुपम खेर, चित्रपट निर्माता इम्तियाज अली, पत्रकार नाविका कुमार, कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ गायक कुमार शानू, अभिनेता व दिग्दर्शक अजिंक्य देव, बॉक्सिंग खेळाडू विजेंद्र सिंग, शिक्षण तज्ज्ञ डॉ. इंदू सहानी, पद्मश्री पोपटराव पवार, आदींना सन्मानित करण्यात आले.