06.07.2021: करोना काळात सेवा देणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
06.07.2021: करोना उद्रेकानंतर शाळा व कंपनीच्या बसेस व वाहने गरजु रुग्णांच्या सेवेकरिता ऍम्ब्युलन्स सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील ५० ऍम्ब्युलन्स चालक, व्यवस्थापक, स्कुल बस मालक व स्कुल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला.