06.06.2026: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शक्ती समिट-२०२६’ चे पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे आयोजन
06.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे आयोजित ‘शक्ती समिट-२०२६’ पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (निवृत्त), क्विंटसेन्स फ्रॅग्रान्सेस प्रा. लि.चे अध्यक्ष भरत कामटे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, एचईएफचे अध्यक्ष तथा ‘पार्टेक्स एआय’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गौरव त्रिपाठी, फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आदी उपस्थित होते.