06.03.2025: मुरली देवरा स्मृती व्याख्यानमालेत मा. उपराष्ट्रपतींनीयांनी पहिले पुष्प गुंफले

06.03.2025: दिवंगत केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या ‘मुरली देवरा स्मृती व्याख्यानमालेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी ‘नेतृत्व आणि प्रशासन’ या विषयावर त्यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला डॉ. श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मिलिंद देवरा आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.