06.03.2023 : सांताक्रुझ येथील विकास रात्र विद्यालयाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
06.03.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईतील सांताक्रुझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला भेट दिली व काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपनगर शिक्षण मंडळ तसेच संस्थेचे अध्यक्ष व नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, रात्र शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रहास देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, विकास रात्र विद्यालयाचे प्राचार्य दीपक कोतेकर, शिक्षक, विदयार्थी व आश्रयदाते उपस्थित होते.