06.01.2021 : पत्रकार दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते संपादक व पत्रकार सन्मानित
06.01.2021 : पत्रकार दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपादक, पत्रकारांचा उल्लेखनीय कार्याबददल सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दै. पुढारीचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, लोकमतचे समुह संपादक विजय बाविस्कर, झी २४ तास चे दिपक भातुसे, लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदीप आचार्य, ज्ञानदा कदम, निखीला म्हात्रे, रुपाली बर्वे, श्रीमंत माने, यांसह पत्रकार व समाजसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.