05.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार

05.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत व त्यांच्या पत्नी अमिता उदय लळीत यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दीपांकर दत्ता, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच मुंबई उच्च न्यायालयातील आजी व माजी वरिष्ठ न्यायाधीश यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.