05.07.2023: राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्ऩ
05.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक परिसराच्या शिलान्यासाचे अनावरण केले तसेच विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारोपाला संबोधित केले. दीक्षांत समारोहात २०,५३५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तसेच १३७ स्नातकांना पीएच.डी. व ३९ स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित, कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु श्रीराम कावळे तसेच विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, अध्यापक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.