05.03.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.