06.02.2025: राज्यपालांच्या हस्ते इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स या संस्थेतर्फे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व या विषयावर आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

06.02.2025: इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स या संस्थेतर्फे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व या विषयावर आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज हॉटेल ताज लँड्स एंड, मुंबई येथे केले. माजी सरन्यायाधीश व IOD चे सहअध्यक्ष न्या. उदय लळीत, CMD, चार्ल्स ग्रुप जोस चार्ल्स मार्टिन, इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष ले.जन. सुरिंदर नाथ, सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी, इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष व माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, महासंचालक अशोक कपूर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.