05.02.2023 : ३६००० महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थानला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

05.02.2023 : जनशिक्षण संस्थान, रायगड या संस्थेने कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविलेल्या ४०० प्रशिक्षित महिलांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आला.’पंखांना बळ कौश्यल्याचे: यशस्वीतांचा सत्कार’ या कार्यक्रमा अंतर्गत रायगड जिल्ह्यातील या अर्धशिक्षित, निम्नशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील व आता स्वयंपूर्ण झालेल्या महिलांचा यावेळी सामूहिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थान, रायगडचे अध्यक्ष नितीन गांधी, निमंत्रक डॉ मेधा सोमैय्या, युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ किरीट सोमैया, यशस्विता रत्नप्रभा बेल्हेकर, डॉ विजय कोकणे आदी उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून ३६००० महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.